*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*निर्विकार स्पंदने*
****************
जिथे गुंतली होती स्पंदने
तो निर्विकारी भास होता
सारा खेळ तो प्रारब्धाचा
गतजन्मांचाच शाप होता
भोगण्याचे वरदान जीवा
लोचनी तो कृपावंत होता
लाभलेल्या ऋणानुबंधांना
क्षणाक्षणा सावरीत होता
सत्कर्मी संस्कार संचिती
हाची एक उ:शापच होता
झेलता सुखदुःख वेदनांना
भावस्पर्श सात्विकी होता
सोबती निसर्गाची सावली
माहोल सारा निःशब्द होता
*********************
*( 15 )*
*वि.ग.सातपुते. (भावकवी )*