*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गुलाब*
लाल लाल गुलाब
दिसतो लाजबाब
काट्यात बसतो
खुद्कन हसतो
धवल,नि गुलाबी,
केशरी,नि पिवळा
रंग तुझे अनेक
दिमाखात सोहळा
रंग रंगात डोलतो
रुप तुझे देखणे
गाल गुलाबी नारीचे
तुझीचं उपमा असणे
काट्यावरचा गुलाब तो
ऐटित झाड़ावर डोलतो
चंदन गंधित स्पर्शतुन
पिवळा पक्षी हळूच उडतो
गुलाबपाणी सुगंधाचे
फवारून तुषार
मंगल समयी होतो
आनंदी दरबार
प्रेमी युगुल देतात
लाल गुलाब हाती
नि होतात दोघेही
जन्माचे सोबती
*शीला पाटील. चांदवड*
