तिराळी पंचक्रोशीतील सरपंचांचे उपोषण स्थगित
हत्ती पकड मोहीम राबवण्यास शासन सकारात्मक : सरपंच शेतकरी यांची मुंबईत वनमंत्र्या सोबत बैठक
दोडामार्ग
खानापूरच्या धर्तीवर तिलारीत हत्ती पकड मोहिम राबवा या मागणीसाठी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य १० तारीखपासून साखळी उपोषण छेडणार होते मात्र रविवारी सकाळी झालेल्या विशेष बैठकीत आंदोलन तात्पूरते स्थगित करण्यात आले. सुरुवातीपासून प्रशासनाने हत्ती पकड मोहीमेबाबत कधी नव्हे ती सकारात्मक भूमिका घेतली आणि पालकमंत्री, स्थानिक आमदार यांनीही दिलासादायक भूमिका जाहीर केली यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी सांगितले. साटेली भेडशी येथे ही बैठक संपन्न झाली. यावेळी तालुक्यातील सरपंच मोठया संख्येने उपस्थित होते.