You are currently viewing कुडाळ येथे अथायु मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर व महिला व बाल रुग्णालय कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर संपन्न 

कुडाळ येथे अथायु मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर व महिला व बाल रुग्णालय कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर संपन्न 

कुडाळ येथे अथायु मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर व महिला व बाल रुग्णालय कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर संपन्न

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळ तालुका येथे रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 या रोजी सकाळी 11 वाजता अथायु मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर व महिला व बाल रुग्णालय कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन दीप प्रलोजन व श्रीफळ वाढवून कुडाळ रुग्णालयाचे डॉक्टर बालरोगतज्ञ श्री संजय वाळके यांच्या हस्ते करण्यात आले यांनी याप्रसंगी गोरगरीब रुग्णांना जिल्ह्यातील व कुडाळतील मोफत रुग्णसेवा व शस्त्रक्रिया अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर या रुग्णालयामार्फत होते त्याचा फार दिलासा रुग्णांना होत असतो असे उदगार त्यांनी काढले तसेच जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी अथायु मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर मार्फत गेल्या सात-आठ वर्षांमध्ये हजारोंच्या संख्येने मोफत शस्त्रक्रिया औषधे व जेवण महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजना अंतर्गत दिली जाते यासाठी अनेक गोरगरीब रुग्णांना दिलासा देण्याचे काम या रुग्णालयामार्फत होते तसेच दरवर्षी जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात अशी महाआरोग्य शिबिरे घेऊन या हॉस्पिटलमार्फत मोफत बस सेवा रुग्ण व त्यांच्या बरोबर एक नातेवाई क कोल्हापूर मध्ये रुग्णालयात घेऊन गेला जातो व रुग्णाला शस्त्रक्रिया करून औषधे व जेवण देऊन घरपोच तालुक्याच्या ठिकाणी या रुग्णाला मार्फत पाठवले जातात यासाठी मी रुग्णालयाचे संचालक यांच्याशी बोलून आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना महाआरोग्य शिबिर झाल्यानंतर त्यांना बस सेवा मोफत द्यावी अशी सुद्धा मागणी मी केली होती यामुळे रुग्णांना दिलासा देण्याचे महान कार्य या रुग्णालयामार्फत होते असे भावपूर्ण उदगार जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी काढले अथायु मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे मार्केटिंग मॅनेजर श्री मदन गोरे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून या महा आरोग्य शिबिराचे येणाऱ्या रुग्णांचे आभार मानले यावेळी अथायु मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे कोड ने टर श्री वैभव काटकर तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रदीप चौगुले अथायु रुग्णालयाचे डॉक्टर श्री मुळीक सामाजिक कार्यकर्ते संजय तानावडे वगैरे कार्यकर्ते व रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक या महा आरोग्य शिबिराला भाग घेतला होता यावेळी शिबिरामध्ये बायपास शस्त्रक्रिया एन्जोप्लास्टी हृदयाला वॉल बसवणे मुतखडा पित्यशाच्या पिशवीत खडे असणे व्हेरिकोज व्हेन्स हाडांची शस्त्रक्रिया मणक्यांचे आजार अशा विविध प्रकारच्या रुग्णांची तपासणी करून यांना रुग्णालयामार्फत कोल्हापूर अथायु मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल या मार्फत शस्त्रक्रियेसाठी मोफत बस सेवा मार्फत बुधवारी घेऊन जाण्यात येणार आहे अशी माहिती सावंतवाडी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसूरकर यांनी दिली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा