You are currently viewing शेगावीचा राणा

शेगावीचा राणा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शेगावीचा राणा*

 

रंगतो आम्ही तुझ्या, श्रद्धेच्या सागरात

शेगावीचा राणा तूची ,वसशी अंतरात।धृ।।

 

अतोनात असे श्रद्धा ,तूच माझा आनंद

वेळोवेळी साधते , तुझ्याशीच संवाद

सेवा घडावी तुझी, नेमाने दिनरात

शेगावीचा राणा तूची, वसशी अंतरात ।। १।

 

गुण वर्णाया तुझे ,शब्द माझे बोबडे

कृपा लाभण्या‌ मजला ,यत्न पडो ना तोकडे

तूच दावी मार्ग आता, अज्ञानाच्या अंधारात

शेगावीचा राणा तूची, वसशी अंतरात ।।२।।

 

येता संकटे जीवनी, तुझाच असे हवाला

अच़बित करती मना ,तुझ्या अगाध लीला

अंतिम क्षणात माझ्या, दे हात घट्ट हातात,

शेगावीचा राणा तूची ,वसशी अंतरात…।।३।।

 

प्राणिमात्र सेवाधर्म, उपदेश मानवास

आसुसले भक्त सारे, म्हणे व्हावा सहवास

कृपाप्रसादे ठेव शिरी , तुझा आश्वस्त हात

शेगावीचा राणा तूची , वसशी अंतरात ।।४।।

 

©️®️ डॉ.सौ. मानसी पाटील

प्रतिक्रिया व्यक्त करा