You are currently viewing कवठणी येथील ग्रुप डान्स स्पर्धा व पारितोषिक वितरण कार्यक्रमात दत्ता कवठणकर मित्र मंडळ मार्फत श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांचा सत्कार

कवठणी येथील ग्रुप डान्स स्पर्धा व पारितोषिक वितरण कार्यक्रमात दत्ता कवठणकर मित्र मंडळ मार्फत श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांचा सत्कार

*कवठणी येथील ग्रुप डान्स स्पर्धा व पारितोषिक वितरण कार्यक्रमात दत्ता कवठणकर मित्र मंडळ मार्फत श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांचा सत्कार*

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील कवठणी येथे काजरोबा जत्रौत्सवाच्या निमित्ताने शुक्रवार दिनांक, ८ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कवठणी येथील उद्योजक श्री. दत्ता कवठणकर यांच्या हस्ते शैक्षणिक व सामाजिक कार्याची विशेष दखल घेत सावंतवाडी तालुक्यातील कवठणी गावचे भूमिपुत्र, तिमिरातूनी तेजाकडे संस्थेचे व चळवळीचे संस्थापक व प्रणेते, श्री. सत्यवान रेडकर सर यांना गौरविण्यात आले. दत्ता कवठणकर मित्रमंडळ आयोजित राज्यस्तरीय खुल्या ग्रुप डान्स स्पर्धेत रत्नागिरी – खेड येथील ओम साईराम ग्रुपने प्रथम पारितोषिक रू. २५,०००/- व चषक, द्वितीय – आर डी एक्स ग्रुप – सावंतवाडी यांनी रू. १५,०००/- व चषक, तृतीय – ज्ञानदीप कलामंच – मळेवाड यांनी रु. १०,०००/- व चषक पटकावले. स्पर्धेचे औचित्य साधून ‘गावय’ नाटकाचे दिग्दर्शक रुपेश कवठणकर, कलाकार रवींद्र हळदणकर, पपी कवठणकर, यामेश्वर कवठणकर यांना माजी महिला व बाल कल्याण सभापती, शर्वाणी गावकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. परीक्षक स्वरूपात ऍड निलोफर खान, कोरिओग्राफर सुदेश साळगावकर यांना उद्योजक दत्ता कवठणकर यांच्याकडून गौरविण्यात आले.

ग्रुप डान्स उत्तेजनार्थ प्रथम – व्ही आर ग्रुप – देवगड, द्वितीय – सिधाई ग्रुप – कुडाळ, तृतीय – आघोरे ग्रुप – मुंबई व उत्तेजनार्थ चौथे बक्षीस – एस के ग्रुप, कणकवली यांना देण्यात आले. उत्तेजनार्थ बक्षीस विजेत्या डान्स ग्रुपना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात आले. स्पर्धेचे बक्षीस वितरण उद्योजक दत्ता कवठणकर, कवठणी गावचे सरपंच अजित कवठणकर, श्री. सत्यवान यशवंत रेडकर सर, ग्रामपंचायत सदस्य यामेश्वर कवठणकर, परीक्षक ऍड निलोफर खान, सुदेश साळगावकर, निवेदक शुभम धुरी, मंडळाचे कार्यकर्ते मयूर रेडकर, मुन्ना हळदणकर, राजन कवठणकर, नितेश कवठणकर, साई कवठणकर, प्रवीण कवठणकर, पपी कवठणकर, संजय कवठणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मोठ्या संख्येने हौशी प्रेक्षकांनी या मनोरंजन कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली.

प्रतिक्रिया व्यक्त करा