You are currently viewing महिला व बालविकास विभागाच्या सरळसेवेची परीक्षा 10 फेब्रुवारी पासून

महिला व बालविकास विभागाच्या सरळसेवेची परीक्षा 10 फेब्रुवारी पासून

महिला व बालविकास विभागाच्या सरळसेवेची परीक्षा 10 फेब्रुवारी पासून

सिंधुदुर्गनगरी 

 आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त आस्थापनेवरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड या संवगातील (१) संरक्षण अधिकारी, गट-ब (अराजपत्रित) २ पदे, (२) परिविक्षा अधिकारी, गड-क ७२ पदे, (३) लघुलेखक (उच्चश्रेणी), गड-क १ पद, (४) लघुलेखक (निम्नश्रेणी), गड-क २ पदे, (५) वरिष्ठ लिपीक/ सांख्यिकी सहाय्यक, गट-क ५६ पदे, (६) संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क ५७ पदे, (७) वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड ४ पदे, (८) कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड ३६ पदे, (९) स्वयंपाकी, गट-ड ६ पदे भूतपुर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील निम्न नमूद सरळसेवा कोट्यातील रिक्त असलेली पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून दिनांक-14 ऑक्टोंबर 2024 ते दिनांक-10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने टी.सी.एस. कंपनीकडून अर्ज मागविण्यात आले होते. सदर २३६ रिक्त पदांकरिता एकूण १ लाख १ हजार ९२७ इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत.

सदर संवर्गाची सरळसेवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने कॉम्पुटरबेस वस्तूनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची ऑनलाईन परीक्षा टी.सी.एस, कंपनीमार्फत विविध परीक्षा केंद्रावर वेगवेगळया शिफ्टमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. सदर ऑनलाईन परिक्षेचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे असून सदरील वेळापत्रक व आवश्यकत्या सूचना या आयुक्तालयाच्या https://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.

उपरोक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी दिनांक- ०१ फेब्रुवारी २०२५ पासून https://www.wcdcommpune.com ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात आलेले असून त्याबाबत रजिस्टर मोबाईलवर सूचना देण्यात आलेल्या आहेत.

सदरील सरळसेवा पदभरती परिक्षा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.दिनांकपरिक्षेचा वारपरिक्षेचाकालावधीपरिक्षेची वेळपदाचे नाव
110.02.2025 

सोमवार

120 Mins9.00 AM-11.00 AMपरिविक्षा अधिकारी, गट – क
120 Mins1.00 PM-3.00 PMपरिविक्षा अधिकारी, गट – क
120 Mins5.00 PM-7.00 PMपरिविक्षा अधिकारी, गट – क
211.02.2025
मंगळवार
120 Mins9.00 AM-11.00 AMपरिविक्षा अधिकारी, गट – क
120 Mins9.00 AM-11.00 AMसरंक्षण अधिकारी, गट – ब (अराज)
120 Mins1.00 PM-3.00 PMपरिविक्षा अधिकारी, गट – क
90 Mins1.00 PM-2.30 PMलघुलेखक (उच्च श्रेणी) गट- क
120 Mins5.00 PM-7.00 PMपरिविक्षा अधिकारी, गट – क
90 Mins5.00 PM-6.30 PMलघुलेखक (निम्न  श्रेणी) गट- क
312.02.2025
बुधवार
120 Mins9.00 AM-11.00 AMपरिविक्षा अधिकारी, गट – क
120 Mins1.00 PM-3.00 PMपरिविक्षा अधिकारी, गट – क
120 Mins5.00 PM-7.00 PMपरिविक्षा अधिकारी, गट – क
413.02.2025
गुरुवार
90 Mins9.00 AM-10.30 AMस्वयंपाकी, गट – ड
120 Mins9.00 AM-11.00 AMसरंक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट – क
120 Mins1.00 PM-3.00 PMसरंक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट – क
120 Mins5.00 PM-7.00 PMवरिष्ठ लिपिक, गट – क
120 Mins5.00 PM-7.00 PMवरिष्ट काळजी वाहक, गट – ड
517.02.2025
सोमवार
120 Mins9.00 AM-11.00 AMवरिष्ठ लिपिक, गट – क
120 Mins1.00 PM-3.00 PMवरिष्ठ लिपिक, गट – क
120 Mins5.00 PM-7.00 PMकनिष्ठ काळजी वाहक, गट – ड

 

सदर परीक्षा पारदर्शी व सुरळीतपणे पार पाडण्याकरिता खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे.

१. परिक्षाची यांचे स्थानिक जिल्हयात व लगतच्या ठिकाणी परीक्षा केंद्र ठेवण्यात आलेले आहे.

२. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक परीक्षा केंद्रावर टी.सी.एस. कंपनीमार्फत केंद्र समवेक्षक व पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात येत आहे. तसेच या आयुक्तालयामार्फत परीक्षा केंद्रावर निरीक्षक यांची नेमणूक करण्यात येत आहे.

३. राज्यातील सर्व ४५ परीक्षा केंद्रावर सिग्नल जॅमरची व्यवस्था करण्यात आलेली असून त्याच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे.

४. सर्व परीक्षा केंद्रावर प्रवेश देताना सुरक्षेच्या कारणास्तव परिक्षार्थीचे पुर्ण स्कॅनिंग करुन प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच बायोमेट्रीक तपासणी, आय(डोळे) स्कैनिंग व फेस रिडींग होणार आहे.

५. सर्व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये या कारणास्तव सी.सी.टी.व्ही. च्या निगरानीखाली परीक्षा पार पाडल्या जाणार असून छायाचित्रण जतन केले जाणार आहे

६. सदर भरती प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यात येत असून उमदेवारांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. तसेच कोणत्याही व्यक्तीने सदर भरती प्रक्रियेबाबत गैरमार्गाने नोकरी देण्याचे/ परीक्षा पास करुन देण्याचे किंवा तत्सम स्वरुपाचे आमिष दाखविल्यास अशा भूलथापांना बळी न पडता त्याबाबत नजीकच्या पोलीस स्टेशनकडे तात्काळ संपर्क करावा.

७. परीक्षा केंद्रावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक यांना परीक्षा केंद्रावर पुरेसा बंदोबस्त व वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी याकरिता या आयुक्तालय स्तरावरुन सूचना व निर्देश देण्यात आलेल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा