You are currently viewing काजू प्रक्रिया उद्योजकांसाठी उद्या मेळाव्याचे आयोजन 

काजू प्रक्रिया उद्योजकांसाठी उद्या मेळाव्याचे आयोजन 

काजू प्रक्रिया उद्योजकांसाठी उद्या मेळाव्याचे आयोजन

सावंतवाडी

महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची ‌ 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभेचे उद्या रविवारी डार्क फॉरेस्ट आंबोली, शिरगावकर पॉईंट येथे सकाळी 10 वाजता ‌ काजू प्रक्रिया उद्योजकांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

काजू उद्योगाच्या मेळाव्यासाठी सर्व काजू प्रक्रिया उद्योजकांनी वेळेत उपस्थित राहावे ‌असे आवाहन करण्यात आले आहे.  वर्षातून एकदा सर्व काजू प्रक्रिया उद्योजक एकत्रित येण्यासाठी, एकमेकांसोबत चर्चा करण्यासाठी, उद्योगाला येणारे प्रॉब्लेम सोडविण्यासाठी , शासनाकडून मिळणारे लाभ समजून घेण्यासाठी, नवनवीन मशीनरींची माहिती घेण्यासाठी सर्वांनी डार्क फॉरेस्ट आंबोली येथे सकाळी १० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा