You are currently viewing आवर घालावा भस्मासुरा

आवर घालावा भस्मासुरा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आवर घालावा भस्मासुरा*

 

अर्घ्य देऊन पूर्वेशाला

प्रदूषण नाही थांबणार

बंदी घालून प्लॅस्टिकवर

पुरेसे नाही *पडणार*

//1//

स्वयंशिस्तीचा उपाय आहे

वाट नाही *बघायची*

नाही वापरायची दळण पिशवी

कापडी पिशवी *वापरायची*

//2//

काढून टाका प्लॅस्टिक घरचे

*बायकाॅट* टाका त्यावरती

गवळ्याकडील *दूध* सुंदर

प्लॅस्टीकमधे नसे त्याची वस्ती

//3//

चहा गाळणी द्यावी *फेकून*

स्टीलची आणावी *सुंदरशी*

प्लॅस्टीकला करून *हद्दपार*

दोस्ती करुया *पर्यावरणाशी*

//4//

हवी कशास प्लॅस्टीक बरणी

आणावी काचेची *जाड जरा*

भरून ठेवावी *साखर गोड*

आवर घालावा *भस्मासुरा*

//5//

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा