You are currently viewing देवगड तहसीलदार पदी आर. जे. पवार यांची नियुक्ती

देवगड तहसीलदार पदी आर. जे. पवार यांची नियुक्ती

देवगड :

सध्या मुंबई उपनगर अंधेरी येथे संजय गांधी योजनेचे तहसीलदार या पदावर कार्यरत असलेले आर. जे. पवार यांची देवगड तहसीलदार पदी बदली करण्यात आली आहे. आर .जे. पवार हे लोकाभिमुख सेवा देणारे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात.

कणकवली तालुक्यामध्ये नायब तहसीलदार तहसीलदार या पदावर सेवा देताना त्यांनी जनतेची कामे करत आपली जनसामान्यांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर त्यांची देवगड येथे बदली झाली होती. व देवगड येथून आर जे पवार यांची अंधेरी उपनगर या ठिकाणी बदली झाली होती. मात्र त्यांना पुन्हा एकदा देवगड तालुक्यात तहसीलदार या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा