*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्वला सहत्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अधुरी प्रीत….*
पहाट वारा, सुसाट सुटला,
मनात भरला, गोड शहारा!
फिरता फिरता वर नजरेला,
नभात दिसला शुक्राचा तारा!
आठव आला तव नजरेचा,
बाणच रूतला माझ्या हृदयी!
कळले नाही कसे, कधी ते,
अधुरी प्रीत उरे आपल्या ठाई!
अतुट बंधन होते जरी ते,
जगास प्रीती नाही कळली!
व्यथा कुणाची, कथा कुणाची,
पतंगा परी ती ही जळली !
चंद्र- चांदणी मिलन नभीचे,
धरणीवर कधी का अवतरते?
काव्यातून जे चांदणे बरसते,
ठिणगी बनुनी विझून जाते !
उज्वला सहस्रबुद्धे

