*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पंचाही सुटला त्या नादात*
होते व्हावयाचे!महात्मा मजला
अंगाशी भिडला!व्रात्यपणा!!
ठेवून आरशी!कपाळा वरती
नव्हती विश्रांती!घेतलेली!!
आखुडसा पंचा!सतत नेसून
पाहीली चालून!चाल त्यांची!!
काहीच जमेना!नुसता बहाणा
घालून वहाणा!काठी हाती!!
उभा उंचावर!सतत राहून
पुतळ्या समान!बसलेला!!
थकून जायचो!लहान वयात
असून हयात!बापू तेव्हा !!
वात्रट पणाचा!कळस गाठला
पंचाही सुटला!त्या नादात!!
विनायक जोशी🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157