*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दे गुलाबी चुंबने*
पाहिले नाजुक तुझे गं या फुलांनी लाजणे
हे प्रिये तू मस्त मजला दे गुलाबी चुंबने
फुललेला पारिजात अन् अनाडी धोतरा
मालतीला मधुर भासे जासवंदी हुंगणे
गंधला निशिगंध जो कर्दळीला नावडे
त्या लिलीला मोहवे बघ आसमंती डोलणे
याच शेवंती फुलांना झोंबतो हा गारवा
पाहतो आनंदुनी मी ती वटारी लोचने
कृष्ण चूड़ा देई पुष्पे त्या चमेलीच्या घरी
साहते ती रातराणी केवड्याचे लुंचणे
या कवींनी डवरली बाग ही गोदा तटी
देत आहे शुभ्र जाई मोगर्या आलिंगने
कृष्ण चूड़ा=गुलमोहोर
*©सर्वस्पर्शी*
©कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.
भाभानगर , मुंबईनाका , नाशिक४२२०११
मो ९८२३२१९५५०