*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वास्तवाचे भान*
****************
चुकले काय कधी कळले नाही
जे प्रार्थीले ते लाभलेच नाही
मौनात द्वंद्व निःशब्द भावनांचे
अंतरात अजूनही शमले नाही
छळते पराधीनता क्षणाक्षणाला
विरहा सावरू कसे कळत नाही
जीव व्याकुळ हा भोळा भाबडा
काय कुठे हरवला कळतच नाही
सारे सारे इथे स्वार्थी स्वमग्नी
कुणास कुणाची जाणीव नाही
दिवस रोजची नित्य सरतो आहे
भान वास्तवाचे कुठे उरले नाही
***********************
*वि.ग.सातपुते ( भावकवी )*