स्व. भाईसाहेब सावंत यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त अर्धाकृती पुतळा अनावरण व स्मरणिका प्रकाशन सोहळा
सावंतवाडी
शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी व नाम. भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्या माध्यमातून लोकनेते नामदार स्व. भालचंद्र अनंत तथा भाईसाहेब सावंत यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त अर्धाकृती पुतळा अनावरण व स्मरणिका प्रकाशन सोहळा दिनांक ४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
माजगाव येथील स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या ‘प्रेरणा’ समाधीस्थळी अर्धाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याचे अनावरण ४ फेब्रुवारी सकाळी ९.३० ला करुन आदरांजली वाहिली जाणार आहे. तद्नंतर १०.३० वा. राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात त्यांच्या स्मृतीपित्यर्थ स्मरणिका प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप असणार असून माजी मुख्यमंत्री खास. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, माजी मंत्री दीपक केसरकर, माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले, आम. निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तसेच आमदार शेखर निकम, माजी खासदार विनायक राऊत, रायगड जिल्हा बँक अध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार अजित गोगटे, माजी आमदार बाळाराम पाटील, रत्नागिरी जिल्हा बँक अध्यक्ष तानाजी चोरगे, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, माजी अध्यक्ष सतिश सावंत, अरूण दुधवडकर, कॉग्रेसचे अजिंक्य देसाई आदींची उपस्थिती राहणार आहे.तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त भाईसाहेब सावंत प्रेमीनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे