You are currently viewing निरोप

निरोप

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम लावणी*

 

*निरोप*

 

रुमाल तुमचा बघा राहिला, घमघमतो फाया

निरोप त्याचा मनी पोचला, मोहरली काया

गाणे माझे ऐकायाला

दुरून आला धनी

पाहुन तुमचा रुबाब न्यारा

बावरले मी मनी

नजरे मध्ये नजर मिसळता तनू लागली गाया

निरोप त्याचा मनी पोचला,, मोहरली काया

राजकुमारा जैसा फेटा

दणकट तुमचे बाहू

मला भावली सोबत तुमची

नका सोडूनी जाऊ

लाल गुलाबी शेला सुंदर मनात भरला राया

निरोप त्याचा मनी पोचला, मोहरली काया

तबकाखाली कसे विसरला

कीं मुद्दामच ठेविला

गुलाब पुष्पा सवे तुम्ही तो

नजरेने दाविला

निघून जाता फिरून आले, काय इथे पहाया

निरोप त्याचा मनी पोचला, मोहरली काया

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

9130861304

केवळ नावासहितच. पुढे पाठवावे

@ सर्व हक्क सुरक्षित

प्रतिक्रिया व्यक्त करा