सावंतवाडी :
सावंतवाडी तालुक्यातील कोंडूरे येथील श्री ब्राह्मण देव मंदिर वर्धापन दिन सोहळा बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त मंदिरात श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला सर्व भाविकांनी सहभागी होऊन तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रम रुपरेषा
१). स.८:०० वा. धार्मिक विधी,
२). सकाळी १०:०० वा. श्री सत्यनारायण महापूजा व आरती
३). दुपारी १:०० वा. तीर्थप्रसाद व महाप्रसाद
४). सायं. ५:०० वा. स्थानिकांची भजने
५). रा.९:०० वा (शंकर मोर्ये प्रस्तुत )श्री.राजन मुळीक (माजी जि.प.सदस्य, माजी सरपंच, ग्रा.पं .मळेवाड कोंडूरे) पुरस्कृत मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.
तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री ब्राह्मण देव मंदिर कोंडूरे व कोंडूरे ग्रामस्थांनी केले आहे.