दुचाकी घसरून तळवडे येथील एक जण जखमी..
सावंतवाडी
दुचाकी घसरून पडल्यामुळे तळवडे येथील नंदकिशोर परब (वय ३८) हे जखमी झाले आहेत. हा अपघात काल सायंकाळी होडावडा बाजारपेठ परिसरात घडला. त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबतची माहिती त्यांचा भाचा यश गावडे (वय १९) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मात्र हा अपघात वेंगुर्ले पोलिसांच्या हद्दीत घडल्यामुळे पुढील नोंद वेंगुर्ले पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

