You are currently viewing दुचाकीने टेम्पोला दिलेल्या धडकेत मोहोळ-सोलापूर येथील दाम्पत्य गंभीर जखमी

दुचाकीने टेम्पोला दिलेल्या धडकेत मोहोळ-सोलापूर येथील दाम्पत्य गंभीर जखमी

दुचाकीने टेम्पोला दिलेल्या धडकेत मोहोळ-सोलापूर येथील दाम्पत्य गंभीर जखमी

मालवण

तारकर्लीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीने समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोहोळ-सोलापूर येथील एक पर्यटक जखमी झाला तर त्याची पत्नी किरकोळ जखमी झाली. हा अपघात दुपारी सव्वा एक वाजण्याच्या दरम्यान वायरी भूतनाथ येथील देवाची पाणंद येथील वळणाच्या रस्त्यावर घडला.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या त्या पर्यटकास ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथून त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी – मोहोळ- सोलापूर येथील एक पर्यटक दांपत्य येथे दुचाकीने पर्यटनासाठी येथे आले होते. दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान ते तारकर्लीच्या दिशेने जात असता वायरी भूतनाथ येथील देवाची पाणंद येथील वळणाच्या रस्त्यावर समोरून मालवणच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोला चालकाच्या बाजूने जोरदार धडक बसली. यात पर्यटक रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्यास, हातास, पायास गंभीर दुखापत झाली तर त्याची पत्नी किरकोळ जखमी झाली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. गंभीर जखमी झालेल्या त्या पर्यटकाला रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. गंभीर जखमी असल्याने त्याचे नाव समजू शकले नाही. या अपघाताची नोंद येथील पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत झालेली नव्हती.

प्रतिक्रिया व्यक्त करा