You are currently viewing “पोस्टल पेन्शन अदालत”चे आयोजन

“पोस्टल पेन्शन अदालत”चे आयोजन

“पोस्टल पेन्शन अदालत”चे आयोजन

सिंधुदुर्गनगरी

पोस्टाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनसंबंधी प्रामाणिकपणे निवारण करण्यासाठी डाक विभाग, क्षेत्रीय कार्यालय गोवा (ज्यामध्ये गोवा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा यांचा समावेश आहे) तर्फे ” पोस्टल पेन्शन अदालत” चे आयोजन केले आहे. पोस्ट मास्तर जनरल, क्षेत्रीय कार्यालय पणजी (गोवा) येथे मंगळवार दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी ठीक 3 वाजता “पेन्शन अदालत” आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सिंधुदुर्ग विभागाचे डाकघर अधीक्षक  यांनी दिली आहे.

            डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन पेन्शन संबंधी ज्या तक्रारींचे निवारण 3 महिन्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा सर्व तक्रारींची या डाक पेन्शन अदालत मध्ये दखल घेतील जाईल. कायदा संबंधित प्रकरणे उदा. उत्तराधिकार तसेच धोरणात्मक स्वरुप संबंधित तक्रारी पेंन्शन अदालत मध्ये विचारात घेतील जाणार नाहीत. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलांसह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यांस मूळ तक्रार पाठविली असेल त्यांचे नाव,हुद्दा संबंधितांनी पेन्शन बाबतची आपली तक्रार पणजी गोवा क्षेत्रीय कार्यालय सचिव वरिष्ठ लेाखाधिकारी महेश एन, यांचे कार्यालय पणजी 403001 इमेल पत्ता acct.goa@indiapost.gov.in यांचे नावे अतिरिक्त प्रतिसह दिनांक 10 फेब्रुवारी 2025 अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी. या नंतर प्राप्त झालेल्या अर्जावर” पेन्शन अदालत” मध्ये विचार करण्यात येणार  नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा