सावंतवाडी :
श्रमिक कामगार कल्याणकारी संघटनेची मार्गदर्शन सभा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांच्या उपस्थितीत आजगाव येथिल धाकोरे येथे पार पडली. या सभेला सावंतवाडी तालुक्यातील, आजगाव, धाकोरा, भोमवाडी, नानोस, आणि तिरोडा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी बांधकाम कामगार यांनी आपल्या समस्या अध्यक्ष यांच्या समोर मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने बांधकाम कामगार यांना ग्रामविकास अधिकारी यांच्या कडून ९० दिवस काम केल्याच्या प्रमाणपत्रावर सही देत नसल्याने आम्ही कामगार असून देखील ग्रामविकास अधिकारी यांच्या कडून आपल्याला वेठीस धरले जात असून अशा ग्रामविकास अधिकारी यांच्या वर कारवाई व्हावी.यातून मार्ग निघावा अशी मागणी कामगार यांच्या कडून यावेळी करण्यात आली.
यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चव्हाण यांनी आपली मागणी रास्त आहे. जे आपल्या हक्काचे आहे ते काबाडकष्ट करणाऱ्या कामगार यांना मिळाले पाहिजे. म्हणून कामगार यांच्या हक्कासाठी श्रमिक कामगार संघटना आपल्या पाठीशी आहे जोपर्यंत आपल्या ला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण पाठपुरवठा करत राहू असे आश्वासन दिले. तसेच जे ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी सही देण्यास टाळाटाळ करुन कामगार यांची पिळवणूक करत आहे अशा वर शिस्तभंग कारवाई साठी मागणी करण्यात येईल असे ही यावेळी बोलताना सांगण्यात आले. यासाठी आजगाव, धाकोरा, भोमवाडी, नानोस आणि तिरोडा या गावातील ग्रामविकास अधिकारी यांच्या वर शिस्तभंग कारवाई साठी कामगार यांच्या कडून अर्ज घेण्यात आले. या दरम्यान अध्यक्ष चव्हाण यांनी बिडिओ वासुदेव नाईक यांच्याशी मोबाईल द्वारे संपर्क साधून ग्रामविकास अधिकारी कामगार यांना सही देत नाही त्यामुळे वेळीच यावर तोडगा काढा असे सांगितले असता बिडिओ यांनी सकात्मकता दाखवत तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी दिले.
यावेळी या मार्गदर्शन सभेला श्रमिक कामगार कल्याणकारी संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा सौ.पूजा बागकर, सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष संदिप चव्हाण, वेंगुर्ला अध्यक्ष विजय बागकर, मार्गदर्शक किरण कुबल, सावंतवाडी अध्यक्ष आत्माराम साटेलकर, राजाराम आजगावकर कुडाळ अध्यक्ष नारायण येरम, अन्य मान्यवर व बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.