नागपूर :
अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड नागपूर आणि थिऑसॉफिकल ऑर्डर ऑफ सर्व्हिस नागपूर द्वारे अनोखा हळदीकुंकू आणि तिळगुळ समारंभ, विरंगुळा केंद्र, हनुमान मंदिर, दुर्गा नगर नागपूर येथे घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. स्मिता मेहेत्रे, उद्घाटकप्रगती मानकर डाॅ. नयना गुरनुले, विशेष अतिथी प्रगती मानकर प्रमुख पाहुण्या माजी नगरसेविका कल्पना कुंभलकर, तसेच प्रणोती कळमकर आणि डॉ. नयना गुरनुले या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. प्रास्ताविक भाषण निमा बोडखे यांनी केले. कल्पना कुंभलकर असे म्हणाल्या की, विधवा भगिनींचा सत्कार करून डॉ.स्मिता मेहेत्रे यांनी एक नवा पायंडा पाडला. विधवा भगिनींच्या संदर्भात परिवर्तन होणे त्यांचा सन्मान होणे हि काळाची गरज आहे असे आपल्या उद् घाटनपर भाषणात डॉ.नयना गुरनुले म्हणाल्या. सौ प्रणोती कळमकर यांनी, आपले ध्येय गाठायचे असेल तर प्रत्येक घटनेकडे सकारात्मकतेने बघितल्यास आपण यशस्वी होऊ शकतो यासंबंधी कथा रूपाने मार्गदर्शन केले.
डॉ. स्मिता मेहत्रे यांनी, “एखादी भगिनी विधवा झाली की तिला अपशकुनी समजून तिचे आप्तही शुभकार्यात तिला समाविष्ट करीत नाही. या मकर संक्रांतीच्या कार्यक्रमात अशा उपेक्षित असलेल्या भगिनींचा सन्मान करून त्यांच्या मनाला उभारी देऊन त्यांच्या दुःखावर सुखाची हळूवार फुंकर घालणे हि काळाची गरज आहे ” असे अध्यक्षीय भाषणात सांगितले.
प्रगती मानकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विधवा भगिनी दिपीका वानोडे, ज्यांच्या पतीचे नुकतेच निधन झाले होते, त्या गहिवरून म्हणाल्या की मला हळदीकुंकूला कोणीच बोलावले नाही, नकोशा वाटते हो मकर संक्रमण परंतु आपण हळदीकुंकू लावले तिळगूळ दिला, वाण दिले व मला एक नवीन उर्जा प्राप्त झाली.
यावेळी ३१ उपेक्षित भगिनींना सन्मानित करण्यात आले. असा अनोखा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल डॉ. स्मिता मेहेत्रे आणि निशिकांत मेहेत्रे यांच्या विषयी आदरयुक्त भावना सगळ्यांच्या मनात होत्या. यावेळी सुनंदा जांबुतकर, नंदा सोनुले, रेखा हिरुडकर यांनी निरनिराळ्या स्पर्धा घेतल्या. भगिनींनी मनमुराद आनंद लुटला.विजेत्यांना पारितोषिक दिली. स्वागत गीत मनीषा गिरडे यांनी सादर केले. या भरगच्च कार्यक्रमात अतिथींचा परिचय डॉ. शील बागडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन उज्वला पाटील आणि आभार प्रदर्शन विद्या सुरकार यांनी केले.
समाजातील उपेक्षित भगिनींचा शाॅल, रोपटे, तिळगूळ,हळदीकुंकू दिल्यामुळे कार्यक्रम हृदयस्पर्शी झाला. सर्व उपस्थित भगिनींना वाण व फराळ देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंदना क्षीरसागर, राणी शहा, सरीता राणेकर डॉ.गोपाल चव्हाण, संगीता लंगडे आदींनी सहकार्य केले.