*विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने बांदा केंद्र शाळेचे स्नेहसंमेलन रंगले*
*बांदा*
भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पीएम श्री जिल्हा परिषद केंद्र शाळेत विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने स्नेहसंमेलन शेवटपर्यंत रंगतदार बनले.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रत्नाकर आगलावे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन बांदा सरपंच अपेक्षा नाईक,उपसरपंच आबा धारगळकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक गणेश गर्दे, सेवानिवृत्त शिक्षिका सरोज नाईक, उर्मिला मोर्ये , अनुराधा धामापूरकर ,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संपदा सिध्दये याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य रूपाली शिरसाट, देवल येडवे, तनुजा वराडकर , शाळा व्यवस्थापन समिती शिक्षणप्रेमी सदस्य निलेश मोरजकर, हेमंत मोर्ये,श्रद्धा नार्वेकर , राधिका गवस,संतोष बांदेकर,सुशांत ठाकूर , प्रदिप सावंत,संगीत शिक्षक गोविंद मराठे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी विविध स्पर्धात्मक परीक्षा, खेळ, विविध उपक्रमात चमकदार कामगिरी केलेल्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी आदर्श विद्यार्थी म्हणून युवराज मिलिंद नाईक तर आदर्श विद्यार्थीनी म्हणून अनुष्का भगवान झोरे या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री जे.डी.पाटील, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक शुभेच्छा सावंत, शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका वर्ग सजावट स्पर्धेत सुयश मिळवलेल्या रसिका मालवणकर, क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक रंगनाथ परब, मुख्याध्यापक शांताराम असनकर यांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना सरपंच अपेक्षा नाईक यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम फायदेशीर असून बांदा केंद्र शाळेचा नावलौकिक विद्यार्थी व शिक्षक यामुळे सर्वत्र होत असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमामुळे स्नेहसंमेलन शेवटपर्यंत रंगतदार बनले.या कार्यक्रमावेळी उपस्थित प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव केला. कार्यक्रम यशस्वी संपन्न करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती,माता पालक,शिक्षक पालक संघ तसेच मुख्याध्यापक शांताराम असनकर, पदवीधर शिक्षक उदय सावळ, रसिका मालवणकर,स्नेहा घाडी ,जे.डी.पाटील , रंगनाथ परब, फ्रान्सिस फर्नांडिस, शुभेच्छा सावंत,जागृती धुरी,कृपा कांबळे, मनिषा मोरे,सुप्रिया धामापूरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.