*स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या कु. प्रार्थना नाईकचे जिल्हास्तरीय आरोंदा संस्था आयोजित चित्रकला स्पर्धेत दैदिप्यमान यश :*
सावंतवाडी
डॉ. पी. वाय. नाईक पुरस्कृत पत्नी स्व. सौ. पुष्पा प्रभाकर नाईक स्मृती प्रित्यर्थ आरोंदा हायस्कूल, आरोंदा येथे आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील इयत्ता तिसरीतील कु. प्रार्थना प्रणय नाईक हिने प्रथम क्रमांक पटकावला. उत्कृष्ट कामगिरी करत कु. प्रार्थना प्रणय नाईक हिने उल्लेखनीय यश प्राप्त केले. गुलाबपुष्प, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पाच हजार रुपयांचे बक्षीस देऊन तिला गौरविण्यात आले. प्रशालेच्या चित्रकला शिक्षिका सौ. सुषमा पालव व कु. विनायकी जबडे तसेच, तिच्या पालकांचेही तिला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. कु. प्रार्थना हिच्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर, प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षकांनी तिचे भरभरून कौतुक केले.