You are currently viewing शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या समस्यांबाबत मंत्रालयात आढावा बैठक संपन्न

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या समस्यांबाबत मंत्रालयात आढावा बैठक संपन्न

सिंधुदुर्ग :

आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील समस्यांबाबत आढावा बैठक मान. मंत्री महोदय यांच्या दालनामध्ये पार पडली. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रिक्त जागांबद्दल तसेच नवीन इमारतीच्या बांधकाम करणारी, नवीन इक्विपमेंट, औषधांची बिल, व्हॅस्कोन कंपनी अत्यंत धीम्या गतीने बांधकाम करत असून त्यामुळे महाविद्यालय उभारण्यात विलंब होत आहे, असे अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आम. निलेश राणे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर मांडले. यावेळी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव व संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा