You are currently viewing माझा दुसरा गाल ! पुढे केला

माझा दुसरा गाल ! पुढे केला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माझा दुसरा गाल ! पुढे केला* 

 

नात्याची वीण उसवली अन

टाके ही खूप हळवे झाले

इधलं सार सरल्यावर

टाक्यांनी शिवणचं!नाकारले

 

गतःकाळच्या सुंदर वाटेवर

नकळत जोडीनं जाण थांबलं

काय नेमकं आमचं चुकलं

शोधायचं !दोघांत राहून गेलं

 

समोरच्या गांधीजींच्या काचेत

आमचे तणावपूर्ण चेहरे हरवले होते

पूर्वीच्या घट्ट प्रेमाच्या आणाभाका

गांधीजींपुढे कुणीचं मांडले नव्हते

 

मर्यादांचा किनारा ध्यानी असला जरी

इच्छा मनी जुना डाव मांडण्याची होती

पश्चिमेच्या मावळणा-या सुर्यामुळे

अंतकरणाची काच तडकली होती

 

गांधीजींचा हसरा चेहरा विश्वास देत होता……!

पोकळतेच्या टोकाने अहंकाराचा फुगा फुटेल कां..!

पुनः जोडीने चालता येईल कां….!

खोल दरीतून!पुनश्च सुर्य उगवेल कां..!

मी!हसणा-या गांधीजींच्या डोळ्यात एकवार पाहिलं……

आणि माझा दुसरा गाल पुढे केला

तिचा हात !माझ्या हातात घेतला

डोळ्यात तिच्या व गांधीजींकडे बघत

माझा पहिला गाल चोळून घेतला

काचेची फ्रेम चकाकली..लख्ख प्रकाश

गांधीजी हसले…दोघांचे गाल हसले

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा