*पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा अवैध धंदे मुक्त करण्यासाठी दिलेला आदेश प्रशासन गंभीरतेने घेताना दिसत नाही.*
*पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच प्रशासनास दिलेल्या आदेशाचे स्वतः अवलोकन करण्याची गरज:- मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर.*
गेल्या चार-पाच दिवसापूर्वी पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. सदर बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावागावात सुरू असलेले अवैध दारूचे अड्डे आणि दारू विक्री, मटका-जुगार कायमस्वरूपी बंद होण्यासाठी कठोर कारवाई करणे तसेच हा जिल्हा ड्रग्स मुक्त व्हावा यासाठी पोलीस प्रशासनाने प्रामाणिकपणे आपली ताकद वापरावी असे आदेश दिले होते.
परंतु पालकमंत्री नितेश राणे यांनी पोलीस प्रशासनास कडक स्वरूपात आदेश देऊनही चार दिवस उलटले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही तालुक्यात पालकमंत्री महोदयांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. किंबहुना पोलीस प्रशासनाने पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला गंभीरतेने घेतलेले ही दिसत नाही. त्या उलट पोलीस प्रशासन असे अवैध धंदे करणाऱ्यांना पाठीशीही घालताना दिसत आहेत. काही पोलीस कर्मचारी तर असे अवैद्य धंदे करणाऱ्या माफीयांसोबत आपली ड्युटी संपल्यानंतर राजरोस मोटरसायकल वरून फिरतानाही दिसत आहेत. व अशा अवैध धंदे करणाऱ्यांना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर तोडगा निघेस्तोवर बचावात्मक भूमिका घेण्याचे आव्हान देखील करत असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.
______________________________
*संवाद मीडिया*
👩💼👩💼👩💼👩💼👩💼👩💼👩💼👩💼👩💼👩💼
*📢 महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी*
*BCA डिग्री कोर्स 2025-26 प्रवेश प्रक्रिया सूचना*
*_महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी हे 1999 पासून सातत्याने महिलांसाठी कार्यरत असलेले रत्नागिरीमधील पहिले BCA महाविद्यालय आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे हे महाविद्यालय महिलांच्या शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी समर्पित आहे._*
*महाविद्यालयाचे वैशिष्ट्ये:*
✅ सुसज्ज ग्रंथालय व अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा.
✅ वसतिगृह, वाय-फाय सुविधा व CCTV निगराणी.
✅ महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन.
✅ महिलांच्या सुरक्षेवर विशेष भर.
✅ प्लेसमेंटसाठी विशेष मार्गदर्शन आणि ट्रेनिंग प्रोग्राम.
✅ CET फॉर्म अचूकपणे भरता यावा यासाठी महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध आहे.
✅ महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा महिलांसाठी आदर्श उपक्रम.
📌 CET परीक्षा बंधनकारक असून, परीक्षेच्या महत्त्वपूर्ण तारखा खालीलप्रमाणे आहेत:
CET नोंदणीची अंतिम तारीख: 10 फेब्रुवारी 2025
*CET परीक्षा दिनांक:*
*▪️मंगळवार, 29 एप्रिल 2025*
*▪️बुधवार, 30 एप्रिल 2025*
*▪️शुक्रवार, 02 मे 2025*
*📔 CET साठी महाविद्यालयात मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातील.*
*🖥️ BCA प्रवेश व CET मार्गदर्शनासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा:*
*👉 WhatsApp Group Link*
*अधिक माहितीसाठी संपर्क:*
*📞 7972997567 / 9420274119*
https://chat.whatsapp.com/C9NyNYZkFefIVFORgLqceT
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी”*
*जाहिरात
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*