*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*देश माझा*
आनंदकंद
गागाल गलगागा, गागाल गलगागा
विश्वात सर्व सुंदर प्राचीन देश माझा
मोठ्या परंपरेचा शालीन देश माझा
भाषा नि धर्म जाती आहे जरी विविधता
एकात्म बंधुतेच्या आधीन देश माझा
गंगा हिमालयाची आहे पवित्र भूमी
गाणे खुल्या नभाचे गाईन देश माझा
घामात गंध ज्याच्या आहे असा अनोखा
गंधात त्या हव्याशा पाहीन देश माझा
विज्ञान तंत्र अवघे साऱ्या जगास सांगू
विश्वात अग्र स्थानी नेईन देश माझा
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
9130861304
केवळ नवसहितच पुढे पाठवावे
@सर्व हक्क सुरक्षित