You are currently viewing भांडुपगाव शिवाई विद्यामंदिर शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण !

भांडुपगाव शिवाई विद्यामंदिर शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण !

मुंबई –

देशाच्या संविधानाला आज ७६ वर्षे झाली. त्याला काहीजण गणराज्य दिन म्हणतात, तर काहीजण प्रजासत्ताक दिन म्हणतात. खरंतर लोकसंख्येच्या दृष्टीने भारत हा देश जागतिक स्तरावर मोठा देश ठरला असून तो सर्वधर्म समभाव यावर आधारित उभा आहे. असे शिवाई विद्यामंदिर शाळेच्या संचालिका तथा सचिव गौरी भोईर यांनी शाळेच्या प्रांगणात आयोजित ध्वजारोहण प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना संबोधित करताना सांगितले. यावेळी गणपती मारूती मंदिर विश्वस्त नरेंद्र पवार, जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर, मुख्याध्यापक रतन भालेराव, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका नेहा भाबल, उपसचिव डॉ. रंजना तामोरे, नरसिंह पाटील, प्रयोगतज्ञ् दत्ताराम घडशी, पालक प्रतिनिधी महेश कोचरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सहशिक्षक भास्कर हरेर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या ‘आपले उद्योजक’ या हस्तलिखाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलताना सूचित केले की, कोरोनानंतर उद्योगांची अवस्था पाहता आव्हाने तयार झाली. ‌त्यांचा धांडोळा घेता हस्तलिखित वाचनीय झाले असून सद्यस्थितीवर प्रकाश टाकणारे आहे ,ते सर्वांनी वाचावे. अशाप्रकारे तयार करण्यात आले असल्याचे नमूद केले. यावेळी शाळेच्या प्रगतीमय वाटचालीचा आलेख उंचावत असल्याचे सहशिक्षिका रंजना भारंबे यांनी सांगितले. सहशिक्षिका स्वप्ना निकम, महानंदा शारूक यांनी आपल्या मनोगतातून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेत घेण्यात आलेल्या स्पर्धात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या विद्यार्थ्यांना नामवंत लेखकांची पुस्तके व प्रशस्तिपत्रक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले. सर्वश्री अजित जगदाळे, सुनील खाडे, प्रिती सोनावणे आदी शिक्षकांनी प्रत्यक्ष सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी मुलांनी विविध कवायती प्रकार सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या सोहळ्यासाठी दुहेरी विभागाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा