अष्टनायिका’ भरतनाट्यम आविष्कारातून मांडली सावंतवाडी संस्थानच्या राजमातांच्या पराक्रमाची गाथा
नृत्यांगना अकॅडमी ऑफ फाईन आर्टस मुंबई यांच्या सादरीकरणाने लोककला महोत्सवाची सांगता
सावंतवाडी
राजवाडा येथे आयोजित लोककला महोत्सवाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या संकल्पनेतून नृत्यांगना अकॅडमी ऑफ फाईन आर्टस मुंबई यांचा ‘अष्टनायिका ‘ हा भरतनाट्यम आविष्कार सादर करण्यात आला. सावंतवाडी राजघराण्याच्या भूतपूर्व राण्यांच्या संघर्षाचा वेध यातून घेतला गेला. राजघराण्यातील स्त्रीयांनी वारसा, परंपरा राखून प्रेम, कर्तव्य, सहनशक्तीच्या सीमा पार करत जीवन संघर्ष व पराक्रम केला. त्यांचा जीवन संघर्ष या भरतनाट्यम आविष्कारातून सादर करण्यात आला.
सावंतवाडी संस्थान व श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या लोककला विभागातर्फे लोककला महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाच्या समारोपप्रसंगी युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या संकल्पनेतून ‘भरतनाट्यम’ हा खास आविष्कार पार पडला. या माध्यमातून राजघराण्याचा राजमातांच्या पराक्रमाची गाथा सांगितली गेली. हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला.
यामध्ये नृत्यांगना अकादमीच्या अंजना डोंगरे, अनुजा प्रभुळेळुसकर, निधी डोंगरे, जुई घाटगे, अश्विनी गोपाल, वृषाली मोघे, कृपाली संगोई, किर्तना नायर आदी प्रमुख नृत्यांगनांचा सहभाग होता.
सौ. डोंगरे यांनी १९९२ मध्ये नृत्यांगना अकादमी ऑफ फाईन आर्टसची स्थापना केली. भरतनाट्यमाचे ज्ञान देत भारतील संस्कृती व वारसा त्यांनी जतन केला. सावंतवाडी राजवाडा येथे त्यांनी केलेल्या सादरीकरणाच विशेष कौतुक झालं. रसिकांची दाद याला मिळाली.
यावेळी उपस्थित राणीसाहेब शुभदादेवी भोसले, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, ॲड. शामराव सावंत, प्राचार्य डॉ. दिलीप भारमल, जयप्रकाश सावंत आदींनी या कलाविष्काराचं विशेष कौतुक केलं.