सावंतवाडी बाजारपेठेत रस्त्यावर टाकलेल्या बारीक खडीवर स्कुटी स्लिप होऊन माय- लेक जखमी सामाजिक बांधिलकीचं मदत कार्य.
सावंतवाडी
सावंतवाडी शहरातील ठीक ठिकाणी रस्त्यावर टाकलेल्या बारीक खडीवर घसरून दर दिवशी दोन ते तीन अपघात होत आहेत तर सदर महिला वेंगुर्ल्यावरून भोसले कॉलेजमध्ये शिकत असलेल्या मुलीला भोसले कॉलेजमध्ये सोडण्यासाठी येत असताना रस्त्यावर तिची स्कुटी स्लीप होऊन आज सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात घडला. शाळकरी मुलगी व तिच्या आईला हात ,पाय व तोंडाला गंभीर दुखापत झाली. त्यावेळेस सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते पेंटर लक्ष्मण कदम यांनी त्या दोघांनाही तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले.त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदर पेशंटच्या नातेवाईकांनी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कदम यांचे आभार मानले.
तसेच लक्ष्मण कदम म्हणाले की बाजारपेठ मध्ये रस्त्यावरील खडीवर घसरून दिवसातून दोन ते तीन अपघात घडत तसेच व्यापाऱ्यांच्या दुकानात सुद्धा धुळीचा साम्राज्य वाढत चाललेला आहे त्यामुळे व्यापारी सदर परिस्थितीला खूप हैराण झालेले आहेत. सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी बाजारपेठेतील रस्त्यावरील खडीवर घसरून दर दिवशी घडत असलेले अपघात थांबवण्यासाठी योग्य आशी कार्यवाही करावी व नागरिकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे.