You are currently viewing वामनराव महाडीक हायस्कूलचे विद्यार्थी करणार जिल्ह्याचे नेतृत्व

वामनराव महाडीक हायस्कूलचे विद्यार्थी करणार जिल्ह्याचे नेतृत्व

*वामनराव महाडीक हायस्कूलचे विद्यार्थी करणार जिल्ह्याचे नेतृत्व*

कणकवली

भारत स्काऊट आणि गाईड राष्ट्रीय कार्यालयाच्या वतीने डायमंड ज्युबिली जांबोरी त्रिची,राज्य तामिळनाडू येथे दि. 28 जानेवारी 2025 ते 3 फेब्रुवारी 2025 या कालावधीत राष्ट्रीय स्काऊट गाईड मेळावा संपन्न होत आहे.या मेळाव्यात वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
सदर डायमंड ज्युबिली जांबोरी,तमिळनाडू करिता प्रशालेतील संबंधित स्काऊट मास्तर पी.एन.काणेकर व गाईड कॅप्टन डी.सी.तळेकर तसेच सहावी व सातवीतील सहभागी झालेले 8 स्काऊट्स व 8गाईड्स यांना संधी प्राप्त झाली आहे.
ही संधी आपल्याला मिळणे हि फार अभिमानाची गोष्ट आहे या संधीचे सोने कराल याची मला खात्री आहे,असे प्रतिपादन प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी केले.
या अभिमानाप्रसंगी विद्यार्थ्यांना मुख्य कार्य.अधि. श्रीकृष्ण खटावकर,शाळा स.चेअरमन अरविंद महाडिक, सर्व शाळा समिती सदस्य,प्राचार्य अविनाश मांजरेकर,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,आजी -माजी विद्यार्थी,पालक मिथील व मैथिली डंबे,श्री.व.सौ.कुमठेकर, मेस्त्री,अभिष्ट नांदलस्कर,ग्रामस्थ यांनी सर्वांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या….

प्रतिक्रिया व्यक्त करा