मालवण कुंभारमाठच्या डॉ. उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांना राज्य शासनाचा जिल्हा कृषी पुरस्कार पालकमंत्री नितेश राणेनकडून प्रदान
सिंधुदुर्ग
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, सिंधुदुर्ग द्वारा जिल्हा कृषी पुरस्कार फोंडेकर यांना आंब्याचे नियोजन बद्ध व्यवस्थापन करून हापूस आंबा उत्पादनामध्ये नवा विक्रम प्रस्थापित करून जगात हापूस आंब्याची प्रथम पेटीची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मान वृंधिगत केल्याबद्दल फोंडेकर यांना डिसेंबर 2024मध्ये जाहीर झालेला पुरस्कार मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पुष्पगुछ शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम आज 26जानेवारी ला प्रदान केला. मंत्री नितेश राणे यांनी भाषणात डॉ. उत्तम फोंडेकर हे सिंधुदुर्ग च नव्हे तर देशासाठी लेजेन्ड आणि प्रेरणादायक आहेत. जगात इतर देशातील आंब्याची प्रथम मक्तेदारी संपुष्टात आणून यांनी महाराष्ट्रातील मालवण कुंभारमाठचे नाव जगाच्या नकाशावर कोरून अटकेपार झेंडे लावले आणि ही व्यक्ती आपल्या सिंधुदुर्गातील असल्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि ते करत असलेल्या संशोधनाला आपले पूर्ण सहकार्य राहील असे सांगितले. तसेच मंत्री राणे यांनी फोंडेकर यांना पावसात लवकर कलमे मोहरण्याबद्दल आणि टिकवान्याबद्दल माहिती जाणून घेतली. फोंडेकर यांनी सतत आंब्याबद्दल संशोधन, जबरदस्त इच्छाशक्ती, कठोर परिश्रम,नेपोलियन बोनापार्ट आणि महाराजा रणजित सिंग यांचेबद्दल विस्तृत वाचन,माझे काका काकी, चुलत बंधू आणि संपूर्ण कुटुंबाचे सहकार्य, कृषी कर्मचारी, आयुक्त, शास्त्रज्ञ् यांचे मार्गदर्शन अशक्य गोष्ट शक्य करण्याची उर्मी यामुळे मी इथपर्यंत पोचलो असल्याचे फोंडेकर यांनी भाषणात सांगितले. तसेच मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी पुरस्काराबद्दल फोंडेकर यांनी मंत्री राणे आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. पुरस्कार स्वीकारताना त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी प्रत्युषा आणि वडील आबा फोंडेकर होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक लक्ष्मण खुरकुटे, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल आणि अन्य कर्मचारी उपस्थित होते.