*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*प्रिय भारतभूमी….*
प्रिय भारतभूमी स्वतंत्र आमुची गर्व असे आम्हा
गणतंत्र दिवस हा जानेवारी सव्वीस आहे ना
राज्य जाहले लोकांचे हो आली घटना अस्तित्वात
कायदे आमुचे राज्य आमुचे लोकांच्या राज्यात…
जगातील ही भली मोठी हो लोकशाही आमुची
रक्त सांडले शहीद झाले परिसीमा बलिदानाची
हटलो नाही पडझड झाली हानी ती मोत्यांची
धन्य आमुचे नेते आणि त्यांच्या परिश्रमाची…
सुजाण आहे जनता आमुची सुज्ञ वर्तते ती
भोक्ति आहे स्वातंत्र्याची स्वतंत्रतावादी
हार न जाते कधी कुणाला जिगरबाज आहे
आदर्शच ती जगातली हो आचंद्रसूर्य राहे…
जणगण आहे प्राण आमुचा “रहे झंडा उॅंचा”
गर्व नि अभिमान उसळतो मनी भारतीयांचा
नसानसातून मातृभूमीचा जयजयकार घुमावा
चिरायू होवो भारत माझा गणतंत्र मनी रूजावा…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)