जिल्हा परिषदेची अखर्चित राहिलेली विस कोटीची कामे तात्काळ पूर्ण करा:
*पालकमंत्री नितेश राणे यांचे आदेश
*अर्थकारणाची कार्यपद्धती अधिकाऱ्यांनी बदलावी.
*सरपंच आणि ठेकेदारांची कामे करून सुद्धा प्रलंबित असलेली बिले विनाविलंब द्यावी
सिंधुनगरी
जिल्हा परिषदेचा विस कोटी निधी अखर्चित आहेत हे योग्य नाही. जनतेचे पैसे खर्च झाले नाहीत. हे मी सहन करणार नाही. ७० कोटी एकुण खर्च करायचे आहेत. ३१ मार्च पूर्वी खर्च झाले नाहीत तर त्या त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार! कामे करणारे सरपंच व ठेकेदाराकडून बिलांसाठी कोणी पैसे घेत असेल तर ते सहन करणार नाही. कोणतीही अडवणूक नको! अशी तंबी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी जिल्हा परिषद आढावा बैठकीत दिली.
जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा यापुढे सहन करणार नाही. मागील वर्षातील वीस कोटी अखर्चित राहिलेत. यापुढे अस चालणार नाही. जनतेच्या कामावरील पैसा वेळेत खर्च करा. असे आदेश मंत्री नीतेश राणे यांनी दिले.
वित्त अधिकारी यांच्या अनुपस्थिती बाबत व त्यांच्या कार्यपद्धती बाबत मंत्री नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली. काम केलेल्या सरपंच व ठेकेदारांची तक्रारी आहे. कामांची बिले पैसे घेतल्या शिवाय मंजूर होत नाहीत. हे तात्काळ थांबवा. याबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घ्यावी. वित्त व कृषी व महिला बाल विकास अधिकारी बैठकीसाठी अनुपस्थित होते त्यांना नोटीस काढा, व गैरहजर अधिकाऱ्यांना उद्या हजर करा असे आदेशही मंत्री नितेश राणे यांनी दिले. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.