You are currently viewing नको करू चिंता

नको करू चिंता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

*नको करू चिंता*

नको करू चिंता जगाची
नको धरूस राग
तुचं तुझी खरी ओळख
बिनधास्त वाग ****

स्त्री जन्म आहे म्हणुन
नको करुस बाऊ
संकटांना दे टक्कर
नको बावरुन जाऊ ***

चालीरीती या जगाच्या
मात्र धरून वाग
नको त्या अंधश्रद्धांना
मात्र धिक्कारुन टाक ***

जगता येईल आयुष्य
आनंदाने जग
नातेगोते साऱ्यांना
धरुन जवळ बघ ***

गृहिणी म्हणुन घराची
तुचं खरी स्वामिनी
संस्काराची कर बरसात
आई बाळांची म्हणुनी

वात्सल्याची तुचं मुर्ती
ममता तुझ्यात साकारी
म्हणुन स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी

स्त्री पुरुष समानतेचा
झेंडा जगी मिरवु दे
मोकळा श्वास घेण्याचा
हक्क सकला मिळू दे ***

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा