You are currently viewing एम. आय. टी. एम.अभियांत्रिकी कॉलेजमध्ये रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह साजरा

एम. आय. टी. एम.अभियांत्रिकी कॉलेजमध्ये रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह साजरा

ओरोस : 

जयवंती बाबू फाउंडेशन संचलित अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यक्रम सिंधुदुर्ग यांच्यामार्फत रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह २०२५ साजरा करण्यात आला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अधिकारी केतन पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी एमआयटीएमच्या विद्यार्थ्यांना रस्ते अपघातावर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी श्री. काळे म्हणाले की, जीवितहानीला रोखण्यासाठी आणि सुरक्षित वाहने चालविण्यासाठी १९८९ मध्ये आपल्या देशात रस्ता सुरक्षा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. गाडी चालवताना मोबाईलचा वापर करू नये, सीट बेल्ट आणि हेल्मेट असणे आवश्यक आहे, चालताना सांभाळून चालावे. झेब्रा क्रॉसिंग वरून रस्ता क्रॉस करावा, वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे व वेग नियंत्रक लावणे आवश्यक आहे. मद्यपान करून वाहन चालवू नये, रोडवरील सिग्नलचे पालन करणे आवश्यक असल्याचे नियम विद्यार्थ्यांना सांगितले.

यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ.एस.व्ही.रुणाल यांनी रस्ता अपघात हे ८० टक्के आपल्या निष्काळजीपणामुळे होतात असे सांगितले. त्यामुळे वाहन चालवताना प्रत्येकाने जागरूकपणे वाहन चालवणे हे प्रत्येक नागरिकाचे काम असले पाहिजे. जर जागरूकपणे वाहन चालवले तर आपल्याकडून होणाऱ्या अपघाताचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होईल, असे विद्यार्थ्यांशी संवाद साधत ते म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक केतन पाटील, डिग्री कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. रुणाल, डिप्लोमा प्राचार्य विशाल कुशे उपस्थित होते. या कार्यक्रमाला यशस्वी होण्याकरिता प्रा. तानाजी शिंदे आणि प्रा. सौ. शरयू पावसकर यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, उपाध्यक्ष विनोद कदम, सेक्रेटरी सौ. नेहा पाल, खजिनदार सी. वृशाली कदम, विश्वस्त केतन कदम यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा