सावंतवाडी :
सिंधुदुर्गचे सुपुत्र, स्तंभलेखक आणि मुख्यमंत्र्याचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर यांच्या जाऊ तिथे खाऊ (खाद्यपर्यटन) आणि कोकण आयकॉन (कोकणातील नर रत्नांची माहिती) या दोन पुस्तकांचे प्रकाशन रविवार २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता सावंतवाडी नाथ पै नाट्यगृह येथे महाराष्ट्राचे बंदरे आणि मत्स्यव्यवसाय खात्याचे मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कवी अशोक नायगावकर, मराठी गौरव गीताचे ज्येष्ठ संगीतकार मा. कौशल इनामदार, जेष्ठ कवी प्रा. अशोक बागवे, जेष्ठ वात्रटीकाकार रामदास फुटाणे, कवी इंद्रजित घुले, माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, युवराज लखमराजे भोसले,, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, महाराष्ट्र साहित्य संस्कृती अनुदान मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ, माजी नगराध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर, पल्लवी केसरकर, श्वेताताई शिरोडकर अनारोजीन लोबो, बबन साळगावकर, आणि सच्चिदानंद परब उपस्थित राहणार आहेत.हा कार्यक्रम सावंतवाडी नगरपालिका, सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघ, सावंतवाडी पत्रकार संघ, कोकण मराठी साहित्य परिषद, सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब, राणी पार्वतीदेवी हायस्कुल माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ हास्य अशोक नायगावकर, कवी अशोक बागवे जेष्ठ वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांची अशोकांच्या नानाची (फुटाणे) टांग ‘धमाल काव्य साहित्यिक संवाद मैफल रंगणार आहे. यात रसिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.