ओरोस :
भाजपच्या ओरोस मंडल अध्यक्षपदी युवानेते आनंद उर्फ भाई सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काल झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ते पद रिक्त झाले होते. आज भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आनंद उर्फ भाई सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते भाजपमध्ये सक्रिय असून भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवले आहे.