You are currently viewing बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मालवण शिवसेनेच्या रक्तदान शिबीराला उत्स्फ़ुर्त प्रतिसाद

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मालवण शिवसेनेच्या रक्तदान शिबीराला उत्स्फ़ुर्त प्रतिसाद

*समाजकारण हा शिवसेनेचा आत्मा आहे – वैभव नाईक*

मालवण :

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मालवण शिवसेना युवासेनेच्या वतीने तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या पुढाकाराने आज मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले.माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.या रक्तदान शिबिरात ४५ रक्दात्यांनी रक्तदान केले.

 

यावेळी मा. आ. वैभव नाईक म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी ८० समाजकारणाची आणि २० टक्के राजकारणाची शिकवण आपल्याला दिली आहे. त्यांच्या शिकवणीनुसार काम करून रक्तदान शिबीर घेऊन समाजाप्रती असलेली बांधिलकी आपण जोपासली आहे. समाजकारण हा शिवसेनेचा आत्मा आहे. अशा सामाजिक कार्यातूनच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली आहे. गर्व से कहो हम हिंदू है! ही घोषणा सर्वप्रथम बाळासाहेबांनी दिली. बाळासाहेब यांनी अनेक कार्यकर्ते घडविले. त्यामुळे बाळासाहेबांना अभिप्रेत असे काम आपण केले पाहिजे. शिवसेनेच्या हिंदुत्वाचे विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत असे मार्गदर्शन वैभव नाईक यांनी केले.

 

यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,शिवसेना प्रवक्ते मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, शहर प्रमुख बाबी जोगी, युवासेना तालुका प्रमुख मंदार गावडे, तालुका समन्वयक मंदार ओरसकर, महेश जावकर, गणेश कुडाळकर, महिला तालुकाप्रमुख दिपा शिंदे, कुडाळ विधानसभा युवतीसेना प्रमुख शिल्पा खोत, युवतीसेना तालुकाप्रमुख निनाक्षी शिंदे, अमित भोगले,भाई कासवकर, नंदू गवंडी, राजू नाडकर्णी, किशोर गावकर, किरण वाळके, हेमंत मोंडकर, भगवान लुडबे, प्रसाद चव्हाण, सुरेश मडये,उमेश मांजरेकर, रूपा कुडाळकर, पायल आढाव, विद्या फर्नांडिस, राहुल सावंत, साई वाघ, ऐवान फर्नांडिस, सिद्धेश मांजरेकर, रश्मी परुळेकर, सोनाली डीचवलकर, साहिल कासले, करण खडपे, झोया खान, आनंद चिरमुले, जिल्हा रुग्णालय ओरोसचे डॉ. संकेत रोटे, प्रांजली परब, विशाल जाधव, नेहा परब, ऋतुजा हरमळकर, नंदकिशोर आडकर, नितीन गावकर यांसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा