कलंबिस्त मुख्य रस्ता डांबरीकरण प्रकरणी कलंबिस्त रहिवाश्यांचा २६ जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा
सावंतवाडी
कलंबिस्त मुख्य रस्ता खडीकरण करून बरेच दिवस झाले मात्र त्यावर अद्याप पर्यंत डांबरीकरण करण्यात आलेले नाही. अनेक वेळा याविषयी आवाज उठवून देखील अजूनही हा रस्ता नादुरुस्त आहे. हा रस्ता व्हावा यासाठी अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आलेला होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, तसेच या पूर्वी १५ जानावेरी ते १५ फेब्रुवारी पर्यंत रस्त्याचे काम पुर्ण करतो असे आश्वासन बांधकाम विभागाने दिले होते. पण अजूनपर्यंत काम सुरु केले नाही. त्यामुळे २६ जानेवारी प्रजासत्ताकदिना दिवशी सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी कार्यालया समोर सर्व कलंबिस्त रहिवाशी उपोषणास बसणार आहोत असे पत्र कलंबिस्त ग्रामस्थ विजय कदम यांनी बांधकाम विभागाला दिले आहे.