*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभिवादन!”*
विवेकानंद आदर्श अतिसुकुमार
साऱ्या विश्वाला देती शांतीचे सार।।धृ।।
लाभले गुरू रामकृष्ण परमहंस
परिस स्पर्शाने झाला जिवनोद्धार।।1।।
सामावले विवेक वैराग्य आनंद
संयम सहृदयता शिकवती सार।।2।।
लाभले कालिकामातेचे आशीर्वाद
हिंदू धर्माचा करिती विश्वप्रसार।।3।।
मुखावरी विलसे सात्विक तेज मूर्त
मानवतेचा करिती विश्वप्रसार।।4।।
श्री अरुण गांगल. कर्जत रायगड.महाराष्ट्र.
पिन. 410201
Cell.9373811677.