You are currently viewing जय गणेश मंदिर मेढा येथे माघी जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

जय गणेश मंदिर मेढा येथे माघी जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

जय गणेश मंदिर मेढा येथे माघी जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मालवण

जय गणेश मंदिर मेढा मालवण येथे माघी जयंती उत्सव २० वा वर्धापनदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे.

३० जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता अॅड. दिलीप ठाकुर व सहकारी नांदी सादर करणार आहेत. रात्री ८.१५ वाजता श्री भूतनाथ भजन मंडळ वायरी भूतनाथ मालवण (बुवा-भालचंद्र केळुसकर) यांचे सुश्राव्य भजन. ३१ रोजी सायंकाळी ५ वाजता श्रीकृष्ण महिला भजन मंडळाचे भजन होणार आहे.

रात्री ८.१५ वाजता वायंगणी आचरा येथील बुवा-सचिन रेडकर यांचे भजन. १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत गणेश जन्मदिनानिमित्त पुणे येथील कीर्तनकार ह.भ.प. सौ. प्रज्ञा देशपांडे यांचे कीर्तन व श्री गणेश जन्म, रात्री ९ वाजता काल्याचे कीर्तन होणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा