*प्रजासत्ताक दिनानिमित्त टाकाऊ इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे संकलन*
पिंपरी
रत्नदीप मित्रमंडळ, थेरगाव या संस्थेमार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतमाता पूजन आणि इलेक्ट्रॉनिक कचरा संकलन या उपक्रमाचे हार्बिंगर समूहाच्या सहकार्याने आयोजन केले आहे. ई-यंत्रण २०२५ अभियानांतर्गत पिंपरी – चिंचवड ई-कचरा जनजागृती व संकलन रविवार, दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:०० ते १०:०० या वेळेत आरोग्यधन आयुर्वेद आणि पंचकर्म केंद्र, लेन – अ, रत्नदीप कॉलनी, टीजेएसबी बँकेच्या मागे, वाकड रस्ता, डांगे चौक, थेरगाव येथे करण्यात येणार आहे. नादुरुस्त आणि निरुपयोगी वस्तूंची सुरक्षितपणे विल्हेवाट कशी लावावी, हा प्रश्न घरोघरी निर्माण झाला आहे. आरोग्य आणि पर्यावरणाला घातक असलेला ई-कचरा सुरक्षितरीत्या संकलित करणे ही एक छोटीशी देशसेवा आहे. यासाठी आपल्याकडील टाकाऊ आणि निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणून द्याव्यात, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश गुजर यांनी केले आहे. याबाबत अधिक माहिती देताना मोबाइल, केबल, चार्जर, टीव्ही, सेट टॉप बॉक्स, लॅपटॉप, ओव्हन, माऊस, की बोर्ड इत्यादी निरुपयोगी वस्तू द्याव्यात. या वस्तूंचे पुनर्वापर केंद्रावर रबर, प्लास्टिक, कॉपर, ॲल्युमिनियम असे वर्गीकरण करून त्याचा पुनर्वापर केला जाईल. मात्र, काचेचे बल्ब, ट्यूब, स्फोटक वस्तू, खेळणी आणि कपडे देऊ नयेत, असे गुजर यांनी सांगितले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
______________________________
*संवाद मीडिया*
👩💼👩💼👩💼👩💼👩💼👩💼👩💼👩💼👩💼👩💼
*📢 महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी*
*BCA डिग्री कोर्स 2025-26 प्रवेश प्रक्रिया सूचना*
*_महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी हे 1999 पासून सातत्याने महिलांसाठी कार्यरत असलेले रत्नागिरीमधील पहिले BCA महाविद्यालय आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे हे महाविद्यालय महिलांच्या शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी समर्पित आहे._*
*महाविद्यालयाचे वैशिष्ट्ये:*
✅ सुसज्ज ग्रंथालय व अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा.
✅ वसतिगृह, वाय-फाय सुविधा व CCTV निगराणी.
✅ महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन.
✅ महिलांच्या सुरक्षेवर विशेष भर.
✅ प्लेसमेंटसाठी विशेष मार्गदर्शन आणि ट्रेनिंग प्रोग्राम.
✅ CET फॉर्म अचूकपणे भरता यावा यासाठी महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध आहे.
✅ महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा महिलांसाठी आदर्श उपक्रम.
📌 CET परीक्षा बंधनकारक असून, परीक्षेच्या महत्त्वपूर्ण तारखा खालीलप्रमाणे आहेत:
CET नोंदणीची अंतिम तारीख: 10 फेब्रुवारी 2025
*CET परीक्षा दिनांक:*
*▪️मंगळवार, 29 एप्रिल 2025*
*▪️बुधवार, 30 एप्रिल 2025*
*▪️शुक्रवार, 02 मे 2025*
*📔 CET साठी महाविद्यालयात मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातील.*
*🖥️ BCA प्रवेश व CET मार्गदर्शनासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा:*
*👉 WhatsApp Group Link*
*अधिक माहितीसाठी संपर्क:*
*📞 7972997567 / 9420274119*
https://chat.whatsapp.com/C9NyNYZkFefIVFORgLqceT
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी”*
*जाहिरात
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*