You are currently viewing बाप…

बाप…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बाप…*

 

बापासारखा बापच असतो दुसरा नाही

वीरासारखा शूरच असतो शंका नाही…

 

पहाड असतो तोलून धरतो घरटे सारे

वारा घराला दु:खाचा मग शिवत नाही…

 

जळणे कष्टणे सांगत नाही मौनच असतो

अश्रू त्याचे पिऊन घेतो हासत राही…

 

बांधाबांधाला तो फिरूनी चिंता वाही

पिके जळूनी गेली तरीही हारत नाही…

 

कर्जाचे ते ओझे त्याच्या खांद्यावरती

हाडाची तो करतो काडे डगमग नाही…

 

छप्पर असते घरदारावर उडता कळते

तो गेल्यावर हिवाळाही मग पोळून जाई…

 

आहे तोवर त्याची महती कळत नाही

तो गेल्यावर हवालदिल त्या दिशा ही दाही…

 

जतन करा हो पाया दगडाचा कळसही तोच

त्याच्यावाचून कुणाघराला वारसा नाही…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा