You are currently viewing आई

आई

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आई*

 

आई मायेची सावली

घरादारा लावी माया

सदा अभिष्टचिंतन

नित्य तिची प्रेमछाया १

 

 

करुणेची मूर्ती आई

देई उत्साह, प्रेरणा

करी चिंता लेकराची

तिच्या अबोल भावना २

 

सहवास आवडतो

तिला आपल्या मुलांचा

जणू गाय गोठ्यातील

स्पर्श प्रिय वासरांचा ३

 

भाग्यवंता मिळतसे

साथ माय माऊलीची

मिळे उत्साह प्रेरणा

गोडी अवीट प्रेमाची ४

 

नाही मायबाप ज्यांना

कशी मिळावी हो माया

पाहवेना त्यांचे दुःख

मूक अश्रू जाती वाया ५

 

 

कृपा कर भगवंता

भाग्य लाभो सकलांना

मिळो मायेची सावली

प्रभू तुझ्या लेकरांना ६

 

 

✒️ प्रतिभा पिटके

शंकरनगर अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा