ठाणे :
ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळ्याच्या आजच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी म्हणजे रविवार दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजता ठाणेकर नागरिकांनी बहुसंख्येने या पुण्यस्मरण सोहळ्याला हजेरी लावली. ठाण्यातील अनेक मान्यवर ह्या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी ज्ञानगुरू प्रल्हाद वामनराव पै यांनी सर्व नामधारकांचे कृतज्ञता पूर्ण कौतुक केले. त्यामुळे नामधारकांना केलेल्या कार्याचे मनोमन समाधान वाटले. कारण जीवनविद्या मिशनचे सर्व नामधारक सद्गुरु प्रेरणेने प्रेरित होऊन कार्य करत असतात. त्यांच्या मनात व्यवस्था रूपाने सद्गुरु श्री वामनराव पै नेहमी असतात. अशी भावना प्रत्येक नामधारकाची असते. प्रल्हाद दादा त्या भावनेचे कायम कौतुक करतात.
रेमंड ग्राउंडच्या व्यासपीठावरून आठ वाजता केलेल्या जनप्रबोधनात ज्ञानगुरू प्रल्हाद वामनराव पै म्हणाले. माणसा माणसातील खल प्रवृत्ती नष्ट होवो. हे ज्ञानेश्वरांनी पसायदानात म्हटले होते. तेच सद्गुरु वामनराव पै यांनी आपल्या विश्वप्रार्थनेत म्हटले आहे. सद्गुरु म्हणतात यश मिळण्यासाठी आपल्याला पैशाबरोबर पुण्याई देखील हवी असते
तेव्हाच माणसाचा उत्कर्ष होतो. कीर्ती, संपत्ती, नावलौकिक आज आहे उद्या नाही. त्यामुळे आपण सर्वांनी विनम्र राहिले पाहिजे असे कायम सद्गुरूंचे म्हणणे होते. याची आठवण प्रल्हाददादांनी करून दिली. ते पुढे म्हणाले, आपल्या वैयक्तिक स्वार्थामुळे माणूस संघर्ष निर्माण करतो. त्यामुळे स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे. माणसाचे सुख चैतन्य स्वरूपात आहे पण हे माणूस विसरत चालला आहे. निसर्गदेवतेने सुंदर शरीर रचना निर्माण केली आहे.
त्यातून आपण समाजासाठी, विश्वासाठी आनंद प्रक्षेपित करू शकतो. आजकाल हे माणसाला समजेनासे झाले आहे. म्हणून तो इतरांना दुःख देऊन स्वतः आनंद शोधतो. तसे सुख, समाधान मिळणार नाही. म्हणून माणसाने अहंकाराचा गोविंदराव मध्ये आणू नये. मग दुःखाचे कारण कायमस्वरूपी निघून जाईल. असे विचार ज्ञानगुरू प्रल्हाद वामनराव पै यांनी ठाणेकर नागरिकांना दिले आणि हा सोहळा सगळंसंपन्न झाला.
रुपेश पवार पत्रकार
