*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वी. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
–————————————-
श्री स्वामी समर्थ काव्यवंदना – काव्यपुष्प – ६ वे
___________________________
अक्कलकोटी घेईन दर्शन । संकल्प करी आमुचे मन ।
कधी कधी राही ईच्छा अपूर्ण । अशा भक्तांना स्वामी स्वप्नात देती दर्शन ।। १ ।।
सज्जनगडी स्वामी रामदास । स्वामी गजाननांचा शेगावी निवास । जावे कुठेही दर्शनास ।सर्वत्र असे गुरु-स्वरूपाचा वास ।। २ ।।
अवघे आहे हे सद्गुरू-भावरूप । भाव मनात, श्रद्धा खूप ।
आठवावे सद्गुरू-रूप ।घडे दर्शन चित्तान्तरी ।। ३ ।।
अलौकिक सद्गुरू रूप । व्हावे भक्तिभावे तद्रूप । मनास वाटेल मोठे अप्रूप । जाणता स्वामींचे कार्य स्वरूप ।। ४ ।।
सिद्धपुरुष श्री स्वामी समर्थ । योगी महात्मा श्री स्वामी समर्थ । भक्त-कृपाळू श्री स्वामी समर्थ । गुरुस्थानी श्री स्वामी समर्थ ।।५।।
स्वामी समर्थांचे मी लेकरू । मग चिंता कशाला करू ।
तारीती माझे तारू । दयाघन श्री स्वामी समर्थ ।। ६।।
स्वामी समर्थांचे चरित्र । वाचण्या द्यावे सर्वत्र ।अनभिज्ञ जन जे इतरत्र । त्यांच्यासाठी असे हो माझे हे लेखन ।।७ ।।
********
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
__________________________
कवी अरुणदास – अरुण वि.देशपांडे- पुणे.
___________________________