You are currently viewing कृपासिंधु दुग्ध उत्पादक संस्था चेअरमन पदी शरद धाऊस्कर बिनविरोध

कृपासिंधु दुग्ध उत्पादक संस्था चेअरमन पदी शरद धाऊस्कर बिनविरोध

कृपासिंधु दुग्ध उत्पादक संस्था चेअरमन पदी शरद धाऊस्कर बिनविरोध

व्हाइस चेअरमन पदी लक्ष्मण परब

सावंतवाडी

न्हावेली येथील कृपासिंधु दुग्ध उत्पादक संस्थेच्या चेअरमन पदी शरद धाऊसकर तर व्हाइस चेअरमन पदी लक्ष्मण परब यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हा निवडणूक अधिकारी श्री.धुमाळ यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली.

 

न्हावेली येथील कृपासिंधु दुग्ध उत्पादक संस्थेची चेअरमन, व्हाइस चेअरमन पदाची निवडणूक जाहीर झाली होती. यावेळी‌ संचालकातून अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झालेत. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अध्यक्षपदी शरद ज.धाऊसकर व उपाध्यक्षपदी लक्ष्मण सु. परब यांची एकमताने निवड झाल्याचे जाहीर केले.

 

यावेळी संस्थेचे सर्व संचालक विठोबा गावडे, अर्जुन परब, संतोष निर्गुण, सागर धाऊसकर व सौ. अनुजा धाऊसकर उपस्थित होते. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा