You are currently viewing स्वच्छतेचा आदर्श पाठ घातलाय सर्वोदय नगरातील रहिवाशांनी!

स्वच्छतेचा आदर्श पाठ घातलाय सर्वोदय नगरातील रहिवाशांनी!

‘स्वच्छता मोहीम’ राबवत दिला सुंदरवाडी अधिक सुंदर करण्याचा संदेश!

 

सावंतवाडी :

‘आमचा सर्वांचा एकच नारा, परिसर करूया स्वच्छ सारा!’, ‘चला घेऊ स्वच्छतेचे व्रत हाती, सुंदर करूया सावंतवाडी!’, ‘स्वच्छता हीच सेवा खरी, सुंदर करूया सावंतवाडी नगरी!’, असे स्वच्छतेचे संदेश देऊन सावंतवाडी येथील सर्वोदय नगरमधील रहिवासी बांधवांनी आज सकाळी ठीक सात वाजता परिसर स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छतेचा आदर्श संस्कार रुजविण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. सावंतवाडी नगरपरिषद यांच्या सहकार्याने व सर्व रहिवाशी यांच्या स्वच्छतेच्या सामाजिक जाणीवेतून सदर मोहीम आयोजित करण्यात आली.  सर्वोदय नगर मधील रहिवासी यांनी एकत्र येत सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचे दृष्टीने एकच संघ निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा पहिला टप्पा हा ‘स्वच्छता मोहीम’ राबवून शुभारंभ करण्यात आला आहे.

स्वच्छता मोहिमेसाठी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सागर साळुंखे, स्वच्छता निरीक्षक श्री. नाटेकर यांचे व त्यांच्या सर्व सहकारी बांधवांचे विशेष सहकार्य लाभले.  नगरपालिका कर्मचारी यांचाही सहभाग या स्वच्छता मोहिमेत लाभला. आज सकाळी ठीक सात वाजता सौ. मेघना राऊळ यांच्या घरासमोरील गार्डनमध्ये रहिवाशांनी एकत्र येऊन तसेच स्वच्छता मोहिमेसाठी उपस्थित राहून आपला सहभाग दाखवला. स्वच्छता मोहिमेची यावेळी प्रतिज्ञा देखील घेण्यात आली. सर्वोदय नगर रहिवासी संघाचे मुख्य प्रवर्तक व सामाजिक कार्यकर्ते सुनील राऊळ यांनी उपस्थितांचे स्वागत करत मार्गदर्शन केले.

यावेळी सुनील राऊळ, मेघना राऊळ, अजय गोंदावळे, सचिन नाटेकर, विश्वेश नाईक, अरुण पडवळ, वासुदेव शिरोडकर, रामदास कोरगावकर, ॲड. प्रकाश परब, उषा परब, आत्माराम नाईक, मीना सावंत, विद्याधर तावडे, प्रा. रुपेश पाटील, लक्ष्मीकांत कराड, लाडोजी सावंत, मच्छिंद्र मुळीक, विजय चव्हाण, पुंडलिक राणे, ॲड. राणे, शिवाजी गावित, प्रणाली नाईक, धनंजय डुबळे, प्रा. सुधीर बुवा, शांताराम गावडे, संजय नार्वेकर, आर. एस.  पाटील, विनीत तावडे, डॉ. अंकिता तावडे, ओवी तावडे, हार्दिक तावडे, विजय नाटेकर, संतोष मठकर, विनायक चव्हाण, श्रीकांत राऊळ, हायजिन लुईस फिलिप्स, मोहन पिळणकर, बाजीराव शिंत्रे, प्रदीप कोरगावकर, अशोक कोरगावकर, दीपक एंडेकर यांसह तमाम सर्वोदय नगरातील रहिवासी बंधू भगिनी यांनी स्वच्छता मोहीम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले. शेवटी उपस्थितांचे आभार मेघना राऊळ यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा